माजी आमदार सत्यजित पाटील यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
बांबवडे : शाहुवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांना त्यांच्या आजच्या २६ नोव्हेंबर रोजी असणाऱ्या वाढदिवसानिमित्त साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज परिवाराच्या वतीने उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.
सत्यजित आबा हे एक जाणते युवा लोकप्रतिनिधी म्हटल्यास वावगे ठरू नये. शिवसेनेच्या भगव्या झेंड्याखाली त्यांची कारकीर्द बहरली. अनेक योजना, रस्ते, आणि सुविधा जनमानसापर्यंत पोहचविण्यात त्यांचा हातखंडा आहे. सामान्य माणसाला कशाची गरज असते, याची त्यांना जाणीव आहे. गेल्या कोरोना काळात त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जनतेला सहकार्य करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.

भविष्यात एखादा प्रकल्प आणण्याचा त्यांचा मनसुबा आहे. ज्या माध्यामातून तालुक्यातील तरुणवर्गाला रोजगारानिमित्त बाहेर जावे लागू नये. आज पराभव पचवून सुद्धा जनमानसात स्वाभिमानाने फिरताना त्यांना, लोकांनी पहिले आहे. पराभवाचे कारण सांगून घरात न बसता, लोकांत रहाणे त्यांनी अधिक पसंत केले. यामुळे जनतेत त्यांच्याविषयी आपुलकी अधिक वाढली आहे. याविषयी त्यांच्याशी बोलताना , ते म्हणाले कि, आयुष्यात जय पराजय होत असतातच, परंतु आपला माणूस आपल्यासोबत असावा, यासाठी मी सर्वांच्या सोबत अधिक असतो.

असो. पुनश्च आबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.