माजी नगराध्यक्ष शामराव कारंडे यांना मातृशोक
शाहुवाडी प्रतिनिधी : कोपार्डे तालुका शाहुवाडी येथील हिराबाई दौलू कारंडे यांचे वयाच्या ८० व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या भाजप चे कोल्हापूर जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष व मलकापूर नगर परिषद चे माजी नगराध्यक्ष शामराव कारंडे यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.