विठुरायांच्या भेटीसाठी जमली अवघी मांदियाळी
पुणे ( विशेष प्रतिनिधी ) : वैशाख वणव्याने तापलेल्या धरतीला मान्सून पूर्व पावसाने काही अंशी गारवा दिला. शेतकऱ्यांच्या संपाला सुद्धा तत्वतः मान्यता देवून सत्ताधारी शासनाने शेतकऱ्यांचा तापलेल्या भावनांना काही अंशी शांतता दिली. त्यामुळे रोहिणीचा पेरा साधलेल्या शेतकऱ्याला ओढ लागली विठुमाऊलीच्या भेटीची . त्यामुळे महाराष्ट्रातून ठिकठिकाणाहून वारकरी आपल्या माऊलींच्या भेटीसाठी शिदोरी घेवून पंढरीच्या दिशेने निघाले आहेत.
आज ज्ञानेश्वर माउलींची पालखी पुण्यात दाखल झाली. ‘ विठोबा रखुमाई ‘ च्या गजरात वारकरी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीसोबत पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीने निघाले आहेत.वर्षभर काबाडकष्ट करणारा शेतकरी, आज पहिल्यांदाच संपावर गेला. एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला,तर निर्णय वेगळा होवू शकतो. याची जाणीव शासनाला झाली आहे. याची जाणीव पांडुरंगाला देखील आहे. म्हणूनच शासनाला सद्बुद्धी दिली असावी.
पांडुरंग सुद्धा आपल्या भक्ताला भेटण्यासाठी आतुर झाला आहे. पंढरीच्या घाटावर आपल्या भक्ताची वाट पहात पांडुरंग सुद्धा विटेवर उभा राहून वाट पाहत आहे. आज ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी बरोबरच, तुकोबारायांची पालखी सुद्धा पुण्यात भेटणार आहे. टाळ चिपळ्यांचा गजर ,मृदुंगाचा नाद, आणि विठुरायाच्या भेटीची ओढ, असा त्रिवेणी संगम आपल्याला पहायला मिळत आहे, विद्येच्या नगरीत पुणे इथं. हे आपल्याला पहायला मिळत आहे आमच्या ओमकार पवार, अमित व्हनागडे ,सुरज पाटील या विशेष प्रतिनिधींमुळे.