माणसातील ” पांडुरंग ” जपणारे पैलवान विजयराव बोरगे यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा
बांबवडे प्रतिनिधी : ” विजय ” आपलाच आहे, हे आपल्या स्वकर्तुत्वातून ज्यांनी गेल्या पाच वर्षात अनेक विकास कामांमधून ज्यांनी सिद्ध केले , ते बांबवडे जिल्हा परिषद मतदार संघाचे जिल्हा परिषद सदस्य विजयराव बोरगे, यांचा उद्या दि.२८ सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. अशा सर्व सामान्य जनतेचा आवाज बनलेला ” आपला माणूंस ” म्हणजेच श्री विजयराव बोरगे पैलवान यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्यावतीने उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.

अतिशय निरागस मनाचं हे व्यक्तिमत्व कधी सर्व सामान्य घरातील कुटुंबाचं सदस्य बनलं, हे कुणाला कळलंच नाही. कारण विजयराव यांनी गटतट न पाहता सामान्य जनता हीच आपली ” पंढरी ” मानली. आणि या पंढरीतील विठ्ठल म्हणजे ” सामान्य जनता “. या जनतेच्या सेवेसाठी या माणसाने आपली वखार चालवायला दिली. का, तर जनतेला द्यायला वेळ मिळणार नाही. यासाठी त्यांनी आपलं आर्थिक स्त्रोत थांबवलं. हे सध्याच्या काळात केलेलं समर्पण लहान नाही.

कोविड च्या काळात या माणसाने तालुक्यातील वाड्या वस्त्यांवर आरोग्याची साधने पुरवली. सॅनिटायझर, थर्मल गन, ऑक्सिमीटर हि साधने सामान्य जनतेला देवून खऱ्या अर्थाने रुग्ण सेवा बजावली. कोविड च्या आणीबाणी च्या काळात लोकांना बेड उपलब्ध होत नव्हते, इंजेक्शन चा तुटवडा भासत होता. त्यावेळी या माणसाने रात्रीचा दिवस केला. या सर्व गोष्टी सामान्य जनता कधी विसरू शकत नाही. यावर कुठेही प्रसिद्धीचा हव्यास धरला नाही. आपलं काम हीच पांडुरंगाची सेवा मानली. यासाठी त्त्यांनी भजनी मंडळींना सूरपेटी तबला भेट देवून, आपली सेवा प्रत्येक वाडी वस्तीवर पोहचविण्याचा यशस्वी प्रयत्न केला.

विजयराव बोरगे पैलवान यांनी पंढरीच्या गाभाऱ्यातील पांडुरंगापेक्षा माणसातील पांडुरंग जपला, आणि टिकवला. आता तोच पांडुरंग त्यांच्या पुंडलीकाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. आणि जनतेचा आशीर्वाद म्हणजे कोट्यावधी वारकऱ्यांसहित रुक्मिणी मातेने दिलेले समुद्र मंथनातून निर्माण झालेलं रत्न म्हणजे प्राजक्ताचे फुल आहे. ते निश्चित विजयराव यांना उदंड यशाचे गमक ठरणार आहे.

पुनश्च जिल्हा परिषद सदस्य विजयराव बोरगे यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा