कर्जमाफीसाठी ‘युपी सरकार’ चा अभ्यास करणार : मुख्यमंत्री
मुंबई : उत्तरप्रदेश मध्ये शेतकऱ्यांना केलेल्या कर्ज माफीचा अभ्यास करणार असल्याचे निवेदन, राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केले.
महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधक ‘संघर्ष यात्रा’, अधिवेशन काळात काढत आहेत. त्यात सत्तेत सहभागी असणाऱ्या शिवसेनेनेही ह्या मागणीला पाठींबा दिला असल्याने, भाजप सरकारवर दबाव वाढत आहे. त्यातच उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शेतकऱ्यांची १लाख पर्यंतची कर्जे माफ केली असल्याची घोषणा केल्याने, महाराष्ट्रातील फडणवीस सरकारवर दबाव अधिकच वाढला आहे. यासाठी कर्जमाफी संदर्भात विचार करण्याचे संकेत मुखमंत्र्यांनी दिले आहेत.