मान्सून येता येता थांबला….?
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यात मान्सून येता येता कुठे थांबला, असा प्रश्न शाहुवाडीकरांना पडला आहे. जो मान्सून वेळेआधीच येणार, असे हवामान विभाग सांगत असताना, सुद्धा मृग नक्षत्र निघून आठवडा होत असतानाही, मान्सून मात्र अद्याप आलेला नाही. यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत पडला आहे.

शेतकरी भात पिकांची पेरणी करून, मृग नक्षत्राच्या पावसाची आतुरतेने वाट पहात आहे. इतरही पिके पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. यंदाचा पावसाळा नक्की कसा असेल, याची खात्री देता येत नाही. कारण यावर्षी मान्सूनपूर्व पाऊस झालेला नाही. त्यामुळे जमिनीत पाणी शिल्लक राहिलेले नाही. त्यामुळे मान्सून पूर्व पाऊस न झाल्याने मान्सून चा पाऊस शेतकऱ्याला कोळपणी ची संधी देईल, असे वाटत नाही. त्यात हवामान खात्याच्या अहवालानुसार मान्सून अर्ध्या महाराष्ट्रात पोहचला असून, काही जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. परंतु पावसाची मात्र हुलकावणी अनेक जिल्ह्यांना मिळत आहे.

एकंदरीत पाऊस लवकर यावा, याकडे शेतकरी वर्ग लक्ष देवून आहे.