…” मिडिया ” इज पॉवर
बांबवडे : पत्रकारिता म्हणजे सामाजिक प्रश्न सोडविण्याचं महत्वाचं ठिकाण. इथून ठेवला जातो अंकुश, सर्व वाईट प्रवृत्तींवर, पण त्याचा उपयोग मात्र सामाजिक बांधिलकीसाठी असावा. असंच आपण एक व्यासपीठ निर्माण करून देत आहोत, नव्या पिढीला. पत्रकारिता आणि मार्केटिंग हा सहा महिन्याचा कोर्स, येत्या शनिवार पासून आपण सुरु करीत आहोत. सामाजिक वसा शास्त्रोक्त पद्धतीने जपण्याचा हा संवर्ग मार्ग आहे. कोर्स पूर्ण झाल्यानंतर परीक्षा सुद्धा होतील. आणि आपल्याला याचं प्रमाणपत्र सुद्धा दिले जाईल. लवकर नोंद करा, कारण कोरोना संक्रमण काळ आहे, त्यामुळे प्रशिक्षणार्थींची संख्या मर्यादित असणार आहे. तेंव्हा त्वरित संपर्क साधा. या कोर्स मध्ये अॅडमिशन घेणाऱ्या प्रशिक्षार्थी ना ” प्रेस ” चं ओळखपत्र सुद्धा देण्यात येणार आहे.
पत्रकारिता म्हणजे दुधारी तलवार असते. ते एक शास्त्र असतं. शस्त्र आलं , म्हणजे ते कसं वापरायचं, याचं प्रशिक्षण सुद्धा आलं , तेच आम्ही तुम्हाला या कोर्स अंतर्गत देणार आहोत. याचबरोबर बातम्या कशा मिळवायच्या. त्या कशा लिहायच्या, हे सुद्धा इथं शिकवलं जाणार आहे. त्याचबरोबर बातमीशी संलग्न फोटो कसे काढायचे, त्याचबरोबर बातमी साठी व्हिडीओ शुटींग कसं करायचं, त्याचं एडिटिंग कसं करायचं, हे सुद्धा यात शिकवलं जाईल. हे करीत असताना, जाहिराती कशा मिळवायच्या, त्यासाठी आपण कसं राहायला हवं, कोणते प्रोटोकॉल पाळायला हवेत, हे सुद्धा आम्ही शिकवणार आहोत.
येत्या १ ऑगस्ट पासून आपल्या कोर्स ला सुरुवात होतेय. तेंव्हा त्वरित संपर्क साधा, आपली नाव नोंदणी करा, यासाठी फी असेल केवळ ३०००/- रु. सहा महिन्यासाठी. हा कोर्स फक्त शनिवार आणि रविवार घेण्यात येणार आहे. यासाठी तीन तासाचा कालावधी असणार आहे.
अधिक माहितीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधा : ९९२२९६५६००.