मुंबई,ठाण्यातील लोकांना गावाकडे आणण्यासाठी प्रयत्न : मा.आम.सत्यजित पाटील
बांबवडे : शाहुवाडी-पन्हाळा मतदारसंघातील मुंबई, ठाणे, पुणे यांसह रेडझोन मधील शहरांमध्ये लॉकडाऊन मुळे अडकलेल्या लोकांना गावी येण्यासाठी परवानगी देणेबाबत, शाहुवाडी पन्हाळा तालुक्यातील शिवसेनेच्या वतीने माजी आमदार सत्यजित पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
निवडणुकीच्यावेळी मतदारांना आणण्यासाठी प्रत्येक लोकप्रतिनिधी जातीनिशी प्रयत्न करतात, परंतु केवळ मतांसाठी नव्हे, तर मातदारांच्यासाठी नात्यासाठी आमदार पाटील कार्यरत असतात, हे या घटनेवरून दिसून येते.
या मतदारसंघातील अनेक लोक आपल्या कुटुंबासहित या शहरांमध्ये नोकरीधंद्या निमित्त रहात आहेत. सध्या या शहरांमध्ये कोरोना संक्रमणाने हाहाकार मांडला असून, त्यांचे कुटुंब असुरक्षित होत आहे. येथील कुटुंबे गावी जाण्यास इच्छुक आहेत. परंतु लॉकडाऊन मुळे त्यांना गावी जाता येत नाही. स्थानिक प्रशासनाने प्रयत्न करूनही लोकांचे जेवणासहित इतर सुविधांची कमतरता भासत आहे. तसेच सध्याच्या परिस्थितीत व्यवसाय बंद आहेत. आपला कोल्हापूर जिल्हा ऑरेंज झोन मध्ये येत असल्याने छोटे मोठे उद्योग तसेच शेती च्या माध्यमातून त्यांच्या आर्थिकतेच्या प्रश्नावर काही अंशी का होईना तोडगा निघू शकतो. परंतु हि मंडळी ज्या शहरात रहात आहेत, ते रेड झोन मध्ये येत असल्याने त्यांना गावाकडे येण्यास परवानगी मिळत नाही. त्यामुळे हि मंडळी मिळेल त्या मार्गाने गावाकडे येण्याचा प्रयत्न करीत आहेत. तरी सदर नागरिकांची प्राथमिक तपासणी करून त्यांना गावी येण्यास परवानगी मिळावी, अशा आशयाची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तसेच गावी आल्यानंतर त्यांना गावपातळीवर संस्था अलगीकरण करण्यासाठी, तालुक्यातील शिवसेना पक्ष सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहे. असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी माजी आमदार सत्यजित पाटील, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती हंबीरराव पाटील, जि. प. सदस्य विजयराव बोरगे, पंचायत समितीच्या सभापती सौ.सुनिता पारळे, उपसभापती विजय खोत यावेळी उपस्थित होते.