मुख्यमंत्र्यांनी फडणवीस यांना ” घंटा ” भेट द्यावी- मारुती पाटील नवी मुंबई
बांबवडे : एक ” घंटा ” मुख्यमंत्र्यांनी माजी मुख्यमंत्र्यांना भेट म्हणून द्यावी, ज्या माध्यामातून ते सतत घंटानाद करीत राहतील आणि मंदिर प्रशासनासाठी केंद्राकडून अतिरिक्त निधी उपलब्ध करतील,असे मत नवी मुंबई चे शाखाप्रमुख मारुती पाटील यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना व्यक्त केले. याद्वारे त्यांनी राज्यातील भाजप शासनाने कोरोना संक्रमणाच्या काळात सातत्याने केलेल्या राजकारणाची खिल्ली उडवली.
ते पुढे म्हणाले कि, एक घंटा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेट म्हणून द्यावी कि, जो घंटा नाद ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर वाजवतील. ज्या माध्यमातून पुजारी मंडळींच्या खर्चासाठी आवश्यक असलेला १५ लाख रुपयांच्या निधी पैकी निदान ५ लाख रुपयांचा निधी तरी राज्यासाठी आणतील, आणि त्या माध्यमातून मंदिर व्यवस्थेचा खर्चाचा प्रश्न सुटेल. नुकताच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरु केलेल्या घंटा नाद आंदोलनाची पाटील यांनी खिल्ली उडवली. ज्यावेळेपासून राज्यातील भाजप सरकार पायउतार झाले, त्या दिवसापासून माजी मुख्यमंत्री हवालदिल झाल्याप्रमाणे, ठाकरे सरकारवर हल्लाबोल करीत आहेत. कोरोना संक्रमण काळ अवघ्या जगावर राज्य करीत आहे. त्याचा फटका नवीन स्थापन झालेल्या ठाकरे सरकार ला सर्वाधिक बसला आहे. त्याचबरोबर राज्यातील जनता देखील या महामारीने बेजार झाली आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकार ने परिस्थिती अतिशय कुशल पणे हाताळली आहे. असे असताना, दुसरीकडे मात्र सत्ता गेल्याने राज्यातील माजी मंत्री शासनावर आसूड ओढण्याची एक संधी सोडत नाही. तरीदेखील सध्याचे राज्य सरकार हि कोरोना परिस्थिती हाताळण्यात यशस्वी झाले आहे. परंतु ज्यांना सत्तेशिवाय दुसरे काही दिसत नाही, अशा भाजप सरकार ला अशा परिस्थितीतीत हि राजकारण सुचते, हि दुर्दैवी बाब आहे, असेही श्री मारुती पाटील यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले.