मोरणा धरण १०० % भरले
शिराळा प्रतिनिधी (संतोष बांदिवडेकर): शिराळा शहरासह लाभक्षेत्रातील गावे व औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करणारे मोरणा धरण १००% भरले असून, साडंव्यातून पाणी वाहू लागले आहे. धरणात ७४७.९४ द.ल.घ.फू.पाणी साठा झाला आहे. शिराळा शहराचा व एम आय डी सी पाणीपुरवठा प्रश्न मिटला आहे. लाभक्षेत्रातील गावाच्या नागरिक व शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
मोरणा धरणातील पाण्यावर शिराळा, उपवळे, पाडळी, बिऊर, तडवळे, अंत्री, भाटशिरगांव, मांगले गावातील ऊस व रब्बी पिकांना फायदा होतो. शिराळा शहराला व शिराळा एम आय डी सी पाणीपुरवठा होतो.
मोरणा धरणात पाण्यावर 649 हेक्टर ऊस पिके आहेत.
टी वाय मुल्ला शाखा अभियंता मोरणा मध्यम प्रकल्प शिराळा :
“मोरणा मध्यम पाटबंधारे प्रकल्प मंगळवारी शंभर टक्के भरला असून शिराळा शहरासह लाभक्षेत्रातील अवलंबित पिण्याच्या व शेतीचे पाण्याची चिंता मिटली आहे.”….