” यशराज ऑप्टीकल्स ” ने दिली नवी दृष्टी : ” यशराज ऑप्टीकल्स ” चा आज १२ वा वर्धापनदिन
.
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील बांबवडे इथं येवून, आज एक ‘ तप ‘ पूर्ण झालं. गेली १२ वर्षे बांबवडे नगरीत ग्राहकांची इमाने-इतबारे सेवा केली. ” यशराज ऑप्टीकल्स ” या नावाने अनेकांच्या डोळ्यांना योग्य दृष्टी देण्यासाठी चष्मे दिले. आज या सेवेला बारा वर्षे पूर्ण झालीत. आज १२ वा वर्धापन दिन संपन्न होत असताना, निश्चितच समाधान वाटत आहे, त्याचबरोबर या सेवेचा अभिमान सुद्धा आम्हा कदमबांडे परिवाराला आहे.

एसपीएस न्यूज च्यावतीने . ” यशराज ऑप्टीकल्स ” चे ओंकार व मयूर कदमबांडे यांना त्यांच्या वर्धापनदिनानिमित्त लाख लाख शुभेच्छा

इथं दुकान सुरु करताना, पहिल्यांदा मनात धाकधूक होती. परंतु येथील व्यापारी वर्ग, नव्याने झालेली मित्र मंडळी यांच्यामुळे बऱ्यापैकी आधार वाटला. येथील व्यापारी असोसिएशन ची नेहमीच सहकार्याची भूमिका राहिली. या सगळ्यांचाच आम्ही कदमबांडे परिवार आभारी आहोत.

याचबरोबर ज्या ग्राहकांनी आमच्यावर विश्वास दाखवला, त्या सगळ्यांचेच मनापासून आभार. कारण त्यांनी विश्वास दाखवला नसता, तर कदाचित आम्ही इथं नसतोच. परंतु सर्वच ग्राहकांनी आमच्यावर विश्वास दाखविला.आणि आम्हाला त्यांच्या सेवेची संधी दिली.

इथं केवळ वयोवृध्दच नव्हे, तर तरुण, तरुणींनी सुद्धा आमच्यावर विश्वास दाखवला. त्यांच्या फॅशन ची नव्या विविध गॉगल्स ची मागणी आम्ही वेळेनुसार पूर्ण केली. ग्राहकांना दिलेला शब्द आम्ही नेहमी पाळत आलो. म्हणूनच आज ” १२ वा वर्धापन दिन ” आपल्या सोबत संपन्न करीत आहोत.
आपल्या सगळ्यांच्या सहकार्याचे निश्चितच आभार. आपले ओंकार व मयूर कदमबांडे .