” यशराज ऑप्टीकल्स ” ला ” आय.एस.ओ.” मानांकन : “…कष्टाशिवाय पर्याय नाही उद्योगाच्या प्रगतीला “
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील ‘ यशराज ऑप्टीकल्स ‘ या चष्म्याच्या सेंटर ला ‘ आयएसओ ‘ मानांकन प्राप्त झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच आय. एस. ओ. मानांकन ” यशराज ऑप्टीकल्स ” ला मिळत आहे. त्यांच्या या सन्मानामुळे पंचक्रोशीतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज परिवाराच्या वतीने देखील ओंकार व मयूर कदमबांडे बंधूंचे मनापासून हार्दिक अभिनंदन, व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा.

बांबवडे इथं सुरु असलेल्या ” यशराज ऑप्टीकल्स ” ने अल्पावधीतच आपल्या कष्टाने, आपला चष्मा व्यवसाय त्यांच्या कारकीर्दीच्या उत्तुंग शिखरावर नेवून ठेवला आहे. म्हणूनच त्यांना आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे.

” घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पात्याला, आणि कष्टाशिवाय पर्याय नाही उद्योगाच्या प्रगतीला ” . या उक्तीला साजेसे कष्ट आणि प्रयत्न या दोन्ही बंधूंनी आपल्या व्यवसायात केले आहेत. डोळे तपासणी, आणि त्यासाठी लागणारी जापनीज टेक्नोलॉजी या बंधूंनी आपल्या ग्रामीण भागात राबवली. माफक किमतीत आपल्या ग्राहकांना सेवा देण्याचे व्रत या दोन्ही बंधूंनी स्वीकारले आणि आपला व्यवसाय प्रगतीवर नेण्यात हे दोन्ही बंधू यशस्वी झाले आहेत. इथं ग्रामीण असो, व शहरी, प्रत्येक ग्राहक इथं येवून आपल्या डोळ्यांच्या तक्रारींवर यशस्वी मार्ग काढत आहे. त्यामुळे ग्राहक वर्ग समाधानी होत आहे.

चष्म्याच्या विविध फ्रेम्स, विविध फॅशनेबल गॉगल्समुळे तरुणाई सुद्धा इथं आकर्षित होते. आणि माफक दरात आपल्या पसंतीचे गॉगल्स निवडते. यासारख्या अनेक कारणांमुळे डोळ्यांच्या शोभेसाठी, तसेच डोळ्यांच्या आजारांसाठी यशराज ऑप्टीकल्स हे एकमेव विश्वासार्ह ठिकाण ठरत आहे. म्हणूनच कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच आय. एस. ओ. मानांकन यशराज ऑप्टीकल्स ला मिळत आहे. हे केवळ त्यांच्यासाठीच नव्हे तर शाहुवाडी तालुक्यासाठी सुद्धा भूषणावह ठरत आहे.
यशराज ऑप्टीकल्स चे कदमबांडे बंधूंचे पुनश्च मनापासून हार्दिक अभिनंदन.