यशवंत इंटरनॅशनल इंग्लिश अकॅडमी डोणोली च्या शिक्षकवृंदा चे पालकांकडून कौतुक आणि अभिनंदन
बांबवडे : श्री यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशवंत इंटरनॅशनल इंग्लिश अकॅडमी डोणोली येथील विद्यार्थ्यांचे वार्षिक परीक्षांचे निकाल लागले आहेत. येथील सुमारे ८५ % विद्यार्थी ८५ % पेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाल्यामुळे पालक वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तसेच पालकांनी शिक्षकवृंदा चे पेढे वाटून कौतुक केले आहे.

सध्या सामाजिक जीवनात शिक्षणाला सर्वाधिक महत्व आहे. परंतु हे शिक्षण देणारे शिक्षकवृंद सुद्धा तितक्याच तयारीचे असावे लागतात. ज्या माध्यामातून आपला पाल्य शिक्षणाच्या भट्टीतून तावून सुलाखून निघेल.असेच शिक्षण, यशवंत इंटरनॅशनल इंग्लिश अकॅडमी डोणोली इथं सध्या मिळत आहे. म्हणूनच इथल्या पालकांचा सुद्धा येथील शिक्षकांवर सुद्धा तितकाच विश्वास आहे.

यासाठीच अनेक पालकांनी येथील शिक्षकांसाहित प्राचार्य श्री सचिन जद सर यांचे सुद्धा अभिनंदन केले. आणि शिक्षक व्रुंदांचे तोंड गोड केले. म्हणूनच जर आपल्याला, आपल्या पाल्यासाठी चांगली इंग्लिश शिकविणारी शाळा शोधत असाल , तर यशवंत इंटरनॅशनल इंग्लिश अकॅडमी डोणोली, हीच शाळा आपल्यासाठी पर्याय होणार आहे. असे देखील प्राचार्य जद सर यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले. अधिक माहिती साठी ९३०७१४०२३२, ९१३०९८५५०० या क्रमांकावर संपर्क साधा.