यशवंत इंटरनॅशनल इंग्लिश अॅकॅडमी अँड ज्युनिअर कॉलेज डोणोली, च्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध उपक्रमांनी संपन्न – श्री जद सर
बांबवडे प्रतिनिधी : श्री यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ कोडोली, संचलित यशवंत इंटरनॅशनल इंग्लिश अॅकॅडमी अँड ज्युनिअर कॉलेज डोणोली, तालुका शाहुवाडी इथं स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व ७६ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले आहेत.

या अनुषंगाने ६ ऑगस्ट रोजी सर्व विद्यार्थ्यांना ” पावनखिंड ” सिनेमा दाखवून, विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती तसेच सर्वधर्म समभाव मुल्यांची रुजवणूक केली.

दि. ८ ऑगस्ट रोजी ” राखी बनविणे ” स्पर्धा आयोजित केली. यामध्ये प्रामुख्याने ” तिरंगा राखी ” ने विशेष लक्ष वेधून घेतले. या अनोख्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले.

दि.९ ऑगस्ट रोजी ” क्रांतिदिन ” साजरा करण्यात आला. या निमित्त विद्यार्थ्यांनी देशासाठी बलिदान देणाऱ्या, व स्वातंत्र्यासाठी क्रांती, उठाव करणाऱ्या देशभक्तांचे पोशाख परिधान करून, भाषणे केली. सकाळी १०.३० वाजता शाळेच्या परिसरात ” राष्ट्रगान गायन ” उपक्रम राबविण्यात आला .

दि.१२ ऑगस्ट रोजी ” पर्यावरण शपथ ” व वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला गेला. सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

दि.१३ ऑगस्ट रोजी ” गोपालांची पंगत ” या कार्यक्रमाचे आयोजन शाळेमध्ये करण्यात आले. व सर्वांना एकात्मता व समानता या मूल्यांचे महत्व विद्यार्थ्यांना समजून सांगण्यात आले.

दि. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान ” हर घर तिरंगा ” योजने अंतर्गत जनजागृती कार्यक्रम व शाळेच्या आवारात तिरंगा फडकवला व देशभक्ती व्यक्त केली.

दि.१५ ऑगस्ट २०२२ रोजी भारत देशाचा ७६ वा स्वातंत्र्यदिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास माजी सैनिक अधिकारी श्री पांडुरंग रावजी सागावकर , तसेच मार्च २०२२ च्या १० वी च्या परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या कु. विनिती मारुती जानकर असे दोन्ही पाहुणे या कार्यक्रमास लाभले. मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

कार्यक्रमामध्ये शिक्षकांच्या मनोगतानंतर, देशभक्तीपर ” गीतगायन ” संपन्न झाले. या नंतर ” भारत माता कि जय ” अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी संस्थेचे सचिव डॉ. जयंत पाटील, अध्यक्षा श्रीमती पद्मजा पाटील वहिनीसाहेब , विश्वस्त सौ विनिता पाटील यांनी सर्वांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या व स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. अशी माहिती संस्थेचे प्राचार्य श्री सचिन जद सर, यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना दिली.