यशवंत इंटरनॅशनल स्कूलचे१० वार्षिक स्नेह संमेलन संपन्न
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील डोणोली येथील यशवंत इंटरनॅशनल स्कूल अँड प्रदीप पाटील ज्युनिअर कॉलेज डोणोली यांचे १० वे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न झाले.
श्री यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ कोडोली, संचालित यशवंत इंटरनॅशनल स्कूल अँड प्रदीप पाटील ज्युनिअर कॉलेज डोणोली चे १० वे वार्षिक स्नेह संमेलन मध्ये भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवून देणारी “ ब्लेस्ट इंडिया ” थीम उत्साहात संपन्न झाली.
कार्यक्रमास कलर्स मराठी वाहिनीवरील ‘आई तुळजाभवानी’ मालिकेतील जगदंबा ची भूमिका साकारणाऱ्या नायिका विजयालक्ष्मी कुंभार या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
संस्थेचे सचिव डॉ. जयंत पाटील यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती.
यशवंत स्कूल मधील तीन वर्षाच्या विद्यार्थ्यांपासून अठरा वर्षांच्या विद्यार्थ्यांनी अनेक सांस्कृतिक कला सादर केल्या. यामध्ये नृत्य, नाटक, निवेदन, विविध कसरती असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले. या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
पंचक्रोशीतील पालक व ग्रामस्थांकडून संस्थेचे प्राचार्य श्री सचिन जद सर,कोरीओग्राफर अक्षय हांडे अजय कांबळे पारस कांबळे, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी वृंद, विद्यार्थी यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले होते. सदर कार्यक्रमास साडे तीन ते चार हजार प्रेक्षकांनी उपस्थिती दर्शविली होती.
या कार्यक्रमास संस्थेच्या अध्यक्षा पद्मजा पाटील, विश्वस्त विनिता पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
यशवंत इंटरनॅशनल स्कूल ही शैक्षणिक संस्था शैक्षणिक दृष्ट्या एक नंबर आहेच, पण खेळ आणि विविध स्पर्धा परीक्षा तसेच विविध नवनवीन उपक्रम यामध्ये अग्रेसर आहे. असे देखील पालक वर्गातून बोलले जात आहे.
कार्यक्रमास मुंबई क्राईम ब्रँच चे पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, शाहुवाडी चे सहा.पोलीस निरीक्षक अमित पाटील, पोलीस उपनिरीक्षक परशुराम शिरसाठ, माजी शिक्षण विस्तार अधिकारी सदाशिव थोरात, सातवे गावाचे सरपंच माणिक पाटील,प्रशासकीय व्यवस्थापक पुंडलिक पाटील ,प्राचार्य शिवदत्त उबारे,पंडित साळुंखे, मंदार पसरणीकर, साईवर्धन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिसा प्रभुलकर, आराध्या शेळके, यांनी केले. निवेदन स्नेहा भंडारे आणि आभार वैष्णवी यादव यांनी मानले.
