” यशोदा मल्टीस्पेशालिटी ” ठरतंय सर्वसामान्यांचं आधारस्थान …
शाहुवाडी तालुक्यात यशोदा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ठरतंय सर्वसामान्यांच आधारस्थान. कारण इथं होतायेत औषधोपचार अनेक व्याधींवर, तेही अगदी माफक दरात, तर शासकीय योजनांच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रियेद्वारे मिळतेय संजीवनी अनेक नागरिकांना. यामुळेच हे हॉस्पिटल गरिबांचं आश्रयस्थान होतंय, तर मध्यमवर्गीयांना देखील इथं मिळतोय दिलासा. कारण महात्मा जोतीबा फुले जनआरोग्य योजना, तसेच पंतप्रधान जनआरोग्य योजने अंतर्गत इथं होतायेत मोठ्या शस्त्रक्रिया त्याही मोफत. यामुळे बांबवडे येथील हे यशोदा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे नाव नावारूपाला येवू लागलं आहे.

इथं पिवळ्या, केशरी, त्याचबरोबर पांढऱ्या रेशनकार्ड धारकांना सुद्धा या योजनांच्या माध्यमातून अनेक सुविधांचा लाभ मिळत आहे.
इथं उपलब्ध आहे, अतिदक्षता ( I.C.U. )विभाग, सर्जिकल आणि प्रसूतीसाठी स्वतंत्र कक्ष उपलब्ध आहे. त्याचबरोबर अस्थीरोगासाठी सुद्धा शास्त्रक्रीयांसाहित इथं उपचार केले जात आहेत.. खालील सर्व सुविधा आणि ऑपरेशन्स वरील शासकीय योजनांतर्गत मोफत केल्या जातात.
जनरल सर्जिकल विभाग अंतर्गत अपँडिक्स, हर्निया, आतड्यांचे विकार, होल पडणे आदी व्याधींसाठी इथं ऑपरेशन केले जातात.
युरो सर्जरी अंतर्गत किडनीचे मूतखडे, किडनीचे विकार, मूत्राशयाचे आजार, प्रोस्टेट ग्रंथीचे आदींचे ऑपरेशन सुद्धा इथं केली जातात.
इथं कँसर सर्जरी अंतर्गत आतड्यांचे, स्तनांचे, गर्भाशयाचे, किडनीचे ऑपरेशन सुद्धा केले जातात. अस्थिरोग विभाग अंतर्गत अपघातग्रस्त रुग्णांचे हाडांचे सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स चे ऑपरेशन केले जातात. गुडघ्याचा सांधा तुटणे, प्लेट व रोड घालणे-काढणे आदींचे ऑपरेशन्स सुद्धा इथं केली जातात.
स्त्रीरोग व प्रसूती विभाग अंतर्गत नॉर्मल अथवा सीझर प्रसूती सुद्धा केली जाते. त्याचबरोबर गर्भाशयाची पिशवी काढणे, यासारखी ऑपरेशन सुद्धा इथं केली जातात.
इथं इमर्जन्सी सेवेसाठी विविध डॉक्टर्स मंडळींची भेट ठरलेली असते. यामुळे विविध व्याधींवर तत्काळ उपाय योजना करता येते. या सर्व सुविधा बांबवडे इथंच उपलब्ध झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना कोल्हापूर इथं जाण्याची वेळ येत नाही. यामुळे त्रासाबरोबर पैसेही वाचतात.
असं हे बांबवडे येथील यशोदा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल डॉ. अभिजित जानकर यशस्वीरीत्या चालवीत आहेत. सेवेच्या काळात डॉ. जानकरांचा हसतमुख चेहरा रुग्णांच्या मनातील ताण कमी करतो. केवळ पैसे महत्वाचे नसून, त्याचबरोबर रुग्णांचे आरोग्य सुद्धा तितक्याच क्षमतेने इथे जपले जाते. यामुळेच हे हॉस्पिटल तालुक्यातील तळागाळातल्या जनतेपर्यंत सुविधा पोहोचविण्यासाठी यशस्वी होत आहे. डॉ. जानकर स्वत: एम.एस. सर्जन आहेत, तर त्यांच्याबरोबर कुशल डॉक्टर वृंद सुद्धा इथं सेवा देत आहेत. एक्स-रे काढणे, रक्त तपासणे, या सुविधा सुद्धा हॉस्पिटल मध्येच उपलब्ध आहेत. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना पळा-पळ करावी लागत नाही. असं हे शाहुवाडी तालुक्यातील बांबवडे येथील यशोदा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तालुक्यातील गोर-गरीब जनतेला वरदान ठरत आहे.