वारणा-कोडोली परिसरात गारासह मुसळधार पाऊस
कोडोली प्रतिनिधी :-
वारणा-कोडोली ता.पन्हाळा परिसरात संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास विजेच्या गडगडाट व गारांसह मुसळधार पाऊस झाला.या अचानक आलेल्या पावसाने, उन्हाच्या तडाख्याने हैराण झालेल्यांना गारवा मिळाला. या मुसळधार पावसाने सगळीकडे पाणीच पाणी केले आहे.
तर वारणानगर येथे काही तरुण-तरुणींनी पहिल्या पावसात भिजण्याचा आनंद लुटला