” यशोदा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ” मध्ये यशोदा सोनोग्राफी सेंटर – डॉ.अभिजित जानकर
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील सरूड रोड इथं असलेल्या ” यशोदा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ” मध्ये आत्ता ” सोनोग्राफी सेंटर ” सुद्धा सुरु करण्यात आले आहे. यामुळे इथं येणाऱ्या रुग्णांना सोनोग्राफी साठी बाहेर जावे लागणार नाही. यामुळे रुग्णांना अनेक सेवा एकाच छताखाली मिळणार असल्याने बाहेर पळापळ करावी लागणार नाही.असे मत ” यशोदा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ” चे सर्वेसर्वा डॉ.अभिजित जानकर यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले.

ते पुढे म्हणाले कि, ” यशोदा ” मध्ये अनेक रुग्ण दूरवरून येत असून, बरे होवून, समाधानाने परतत आहेत. डोंगर कपारीत वसलेला आपला रुग्ण कोल्हापूर शहरात गेल्यास, त्यांची पिळवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच प्रवासाचा खर्च वेगळा होतो. दरम्यान अनेकवेळा रुग्णांचे योग्य निदान करणे, हि प्राथमिक जबाबदारी डॉक्टर मंडळींची असते. यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेर पळापळ करावी लागते. यासाठी वेळ झाल्यास, रुग्णावर उपचार करण्यास उशीर होतो.

यासाठी आपल्या हॉस्पिटल मध्येच हि सोनोग्राफी ची सुविधा उपलब्ध केली आहे. यामुळे त्वरित निदान आणि त्वरित उपचार रुग्णांवर होवू शकतो. यामुळे रुग्णांना त्वरित उपचार मिळून, रुग्ण लवकर बरा होण्यास मदत होईल. याची नोंद रुग्णांनी घ्यावी. असेही डॉ. जानकर यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले.