केखले येथे मोफत डोळे तपासणी शिबीर
कोडोली प्रतिनिधी:-
केखले ता.पन्हाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आज दिनांक २५ जून रोजी भारतीय जनता पार्टी, मारुती चॅरिटेबल ट्रस्ट,केखले व एम्पथी फौंडेशन, मुबंई यांच्यावतीने मोफत डोळे तपासणी शिबीर घेण्यात आले.
या शिबिराची सुरुवात भाजपचे पन्हाळा-शाहूवाडी संपर्क प्रमुख अजित काटकर व समाजकल्याण सभापती विशांत महापुरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
या शिबिरमध्ये डोळे तपासणी,औषधं उपचार, मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत, तसेच मोफत चष्मे वाटप ही करण्यात आले. हे शिबीर सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत घेण्यात आले. केखले तसेच केखले परिसरातील २०० हुन अधिक लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
यावेळी भाजचे पन्हाळा तालुका अध्यक्ष सुरेश बेंनाडे, उपाध्यक्ष बाबुराव पाटील, केखले शाखा प्रमुख प्रताप पाटील, केखले गावच्या सरपंच उषा कांबळे, उपसरपंच राजाराम पाटील, सुरज निकम, मारुती चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुशांत पाटील, भाजपचे कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.