युनिसेफ च्या वतीने विद्यर्थ्याना उखळू इथं आरोग्य कीट व शैक्षणिक साहित्याचे वाटप
उखळू (मुकुंद कांबळे ) : शाहुवाडी तालुक्यातील शेवटचे गाव असलेल्या उखळू गावांपैकी अंबाईवाडी विद्यामंदिर इथं युनिसेफ CYDA ग्रामविकास बहुउद्देशीय संस्था मिरज यांच्यावतीने शाळेतील विद्यार्थ्यांना आरोग्य कीट ,व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच विद्यामंदिर खोतवाडी तालुका शाहुवाडी इथं देखील अशा कीट चे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.

संस्थेचे कर्मचारी ज्ञानू कांबळे, नंदा तगारे यांच्या हस्ते साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी शाळेचे शिक्षक श्री, विक्रम पाटील सर, के.डी. सुतार, चोपडे सर, राठोड सर, नायकवडी सर, तसेच आदी मंडळी उपस्थित होती.