येथील घर हि,गुंतवणूक नसून गरज- त्रिवेणी बहुउद्देशीय संकुल
बांबवडे : माणसांसाठी घर किती महत्वाचं असतं, याची जाणीव मात्र कोरोना काळात सगळ्यांनाच झाली. विशेषत: मुंबई सह इतर शहरात वास्तव्यास असलेल्या कोल्हापूर वासियांना याची खास जाणीव झाली. हि स्वत:च्या घराची अडचण, दूर करण्यासाठी शाहुवाडी तालुक्यातील महत्वाची बाजारपेठ असलेल्या बांबवडे इथं ” त्रिवेणी बहुउद्देशीय संकुल ” ची निर्मिती महत्वाची ठरत आहे. इथं लाभतं, आपलं हक्काचं घर. तेही माफक दरात. ” घरी रहा,सुरक्षित रहा “, आपल्या हक्काच्या घराचं आजच बुकिंग करा. असे आवाहन ‘ त्रिवेणी ‘ संकुलाचे निर्माते यांच्याकडून करण्यात येत आहे.
मुंबई, पुणे सारख्या मोठ्या शहरात नोकरीधंद्यानिमित्त स्थायिक झालेले ग्रामस्थ कोरोना काळात आपापल्या गावी परतले, आणि त्यांना वेगळ्याच परिस्थितीला सामोरे जावे लागले. इतर शहरातून परतल्यानंतर होम क्वारंटाईन ची व्यवस्था नसल्याने, शासकीय क्वारंटाईन सेंटर मध्ये नाईलाजास्तव दाखल व्हावे लागले. कॉमन वॉशरूम, कॉमन रूम मध्ये नाईलाजास्तव रहावे लागले. नातेवाईक सुद्धा होम क्वारंटाईन सेंटर मध्ये जेवण देण्यासाठी यायचे, तेही नाईलाजास्तव . दुरून जेवणाचे डबे देणे, तेथील लोकांपासून दहा फुटावर लांब राहणे, हि गोष्ट पूर्वीच्या काही समाज रुढींची जाणीव करून गेली. अशावेळी आपले इथं जर स्वत: चे घर असते, तर आपल्याला या गोष्टींना सामोरे जावे लागले नसते.

शाहुवाडी तालुक्यातील बांबवडे हि बाजारपेठ सुमारे पन्नास गावांना जोडणारी बाजारपेठ आहे. तालुक्यातील कोट्यावधींची आर्थिक उलाढाल या बाजारपेठेत होताना दिसते. अशा मोक्याच्या ठिकाणी जर आपले घर तयार झाले, तर हा मणिकांचन योग म्हणावयास हरकत नाही. आणि हि गरज ” त्रिवेणी बहुउद्देशीय संकुल ” च्या निर्मिती ने पूर्ण झाली आहे. इथं आपल्या गरजेनुसार वन आरके, वन बीएचके, फ्लॅट रेडी पझेशन मध्ये आहेत. त्याचबरोबर पार्किंग व्यवस्था सुद्धा उपलब्ध आहे. या संकुलापासून शाळा, कॉलेज, दवाखाने, आदी सुविधा हाकेच्या अंतरावर आहेत. तर कोल्हापूर-रत्नागिरी महामार्ग संकुलातून बाहेर पडताच लागून आहे. यामुळे शांतता, शिक्षण, वीज, पाणी यासारख्या मुलभूत सुविधा इथं हात जोडून उभ्या आहेत.
त्यामुळे इथं आपलं हक्काचं घर असणं, नक्कीच फायदेशीर ठरेल, चला तर मग त्वरा करा, घेवू या आपलं हक्काचं घर, असं मत या संकुलाचे निर्माते यांच्याकडून सांगण्यात आले.
