‘ गोकुळ ‘ चा उर्जा प्रकल्प आर्थिक फायद्यासोबत पर्यावरण पूरक -विराज शिंदे
बांबवडे : औद्योगिकरणासोबत पर्यावरणाचे रक्षण करणे, हे राष्ट्रीय कर्तव्य जपण्याचे काम कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध संघ सोलर प्रकल्पाच्या माध्यमातून करीत आहे, याचा फायदा आर्थिकदृष्ट्या मिळणारच पण त्यासोबतच इंधन बचत, वायुप्रदूषण रोखण्यास देखील तत्पर आहे, असे गोकुळ च्या गोगवे शीतकरण केंद्राच्या सोलर प्रकल्पाचे अधिकारी विराज शिंदे यांनी सांगितले.
सोलर प्रकल्प कसा फायदेशीर ठरणार असून, याबाबत तांत्रिक माहिती देताना, सूर्याची किरणे एकत्रित करण्यासाठी ज्या प्लेट तयार केल्या गेल्या आहेत,त्या कसे काम करतात ते सांगितले. तसेच यातून किती तापमानाची निर्मिती करता येते, तसेच त्याची साठवणूक कशी केली जाते, हेदेखील त्यांनी सांगितले. त्याचबरोबर हि यंत्रणा हाताळण्यास कशी सोपी आहे, तसेच त्यासाठी जुजबी मनुष्यबळ लागते, यामुळे कमी मनुष्यबळात अधिक उत्पादकता कशी मिळते, हे देखील त्यांनी सांगितले.
तसेच या यंत्रणेचा रिमोट पॅनेल बोर्ड २४ तास आपल्याला या यंत्रणेबाबत माहिती पुरवतो, याचीही माहिती श्री विराज शिंदे यांनी दिली.