योगीराज सरकार यांचा दुर्गम गावातून दौरा पूर्ण
बांबवडे : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा नेते योगीराजसिंह गायकवाड सरकार यांनी शाहुवाडी तालुक्यातील पणुंद्रे पंचायत समिती मतदारसंघाचा संपर्क दौरा नुकताच पूर्ण केला आहे.

राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्यानंतर योगीराज सरकार यांनी सातत्याने लोकांशी संपर्क करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. याच अनुषंगाने त्यांनी पणुंद्रे पंचायत समिती मतदारसंघातील करंजफेण, पाल, सावर्डी, कांटे, मोसम, बर्की, आदी गावांचा संपर्क दौरा पूर्ण केला आहे. या गावांमधील जुन्या जाणत्या लोकांशी संपर्क साधला. त्याचबरोबर तरुण कार्यकर्त्यांशी सुद्धा संपर्क साधला.

एकंदरीत योगीराज सरकार यांनी खऱ्या अर्थाने स्व. आमदार संजयदादांच्या स्वप्नपूर्तीकडे यशस्वी वाटचाल करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यांच्यासोबत आदित्य इंगवले, संदीप केमाडे, शिवाजी गावडे, सुनील सावंत, संदीप पाटील, अमोल सावंत, ऋतुराज पाटील, राजू पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.