रेशन ग्राहक धारकांनी दक्ष राहावे: माथाडी आणि गुमास्ता जनरल कामगार संघटना
बांबवडे : सर्व रेशन धारक ग्राहकांनी रेशन घेताना अनेक गोष्टींची दक्षता घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माथाडी आणि गुमास्ता जनरल कामगार संघटना मुंबई चे उपाध्यक्ष अरविंद माने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
सध्या सुरु असलेल्या कोरोना संक्रमणाच्या काळात ग्राहकांना शासनाकडून जे धान्य पुरवठा होतो,त्याबाबत ग्राहकांनी काळजी घेणे गरजेचे आहे, अशा आशयाने त्यांनी केलेल्या निवेदनात ते म्हणाले कि, रेशन धारकांनी रेशन दुकानदारांकडून ऑनलाईन धान्याची ची पावती मागावी, पावतीप्रमाणे धान्याचे वजन तपासून पाहावे, व पावतीप्रमाणे रक्कम द्यावी. तसेच रेशन धान्याव्यातिरिक्त दिल्या जाणाऱ्या वस्तू या ऐच्छीक असतात. त्याबाबत दुकानदार जबरदस्ती करू शकत नाही. तसेच दुकानदारांनी देखील या वस्तूंबाबत ग्राहकांवर जबरदस्ती करू नये. अशा कोणत्याही घटना घडत असतील,तर तहसीलदार कार्यालय शाहुवाडी यांच्याकडे लेखी तक्रार करावी, किंवा आमच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन अरविंद माने यांनी केले आहे.
संपर्क क्रमांक : ०२२६७०८६६४४ / ०२२२५९५६६८८.