यंदाचा गणराया अॅवार्ड साळशीतील सिध्दीविनायक मित्र मंडळास
शाहुवाडी प्रतिनिधी : पर्यावरण जपणारा उत्सव साजरा करून आपल्या उत्सवाचा आदर्श निर्माण करावा असे प्रतिपादन शाहुवाडी पन्हाळा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.आर आर पाटील यांनी शाहुवाडी येथे केले.शाहूवाडी येथे कोल्हापूर पोलीस दल व शाहूवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने गणराया अॅवार्ड पारितोषकवितरण कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते . यावेळी यंदाचा गणराया अॅवार्ड साळशीतील सिध्दीविनायक मित्र मंडळास प्राप्त झाला.
पुढे बोलताना श्री.आर आर पाटील म्हणाले कि, उत्सव साजरा करताना आपल्या भोवतालच्या घटकांचं अवलोकन करून आपण समाजासाठी काय करू शकतो याचा अभ्यास करून सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातुन समाजभिमुख उपक्रम राबवुन उत्सव साजरा करण गरजेच आहे .
समाजातील अंधासाठी काम करणाऱ्या प्रेरणा संस्थेला व अंध बांधवाना मदत करून त्यांना सहकार्याचा हात दया . तरुण मंडळाच्या कार्यकत्यानी नेत्रदान करण्याचा संकल्प करावा डॉल्बी बंद करून समाज विधायक उपक्रम राबवा असे आवाहन केले .
जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती श्री.सर्जेराव पाटील म्हणाले तरुण मंडळानी समाजाचे प्रबोधन होईल असे उपक्रम राबवून .डॉल्बीला हदपार करा . युवकांनी व्यसनापासुन अलिप्त राहून व्यायामाची आवड जोपासावी
तहसिलदार चंद्रशेखर सानप म्हणाले,उत्सव साजरा करताना कायद्याच उल्लगंन होणार नाही याची दक्षता घेणे गरजेच आहे
या वेळी जिल्हा परिषद सदस्य हंबीरराव पाटील.सतिश नवले यांनी ही मनोगत व्यक्त केले .
प्रारंभी पोलीस निरीक्षक अनिल गाडे यांनी आपल्या प्रास्ताविक पर मनोगतात गणराया अॅवार्ड उपक्रमाची माहीती दिली.मान्यवरांच्या हस्ते गणेश मडळांना अॅवार्ड व प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले .
तालुक्यातील नंबर प्राप्त सार्वजनिक गणेश मंडळाची अनुक्रमे नांवे अशी सिध्दीविनायक मित्र मंडळ साळशी . नरहर तरुण मंडळ मलकापूर . गणेश तरुण मंडळ डोणोली एक गाव एक गणपती क्रमांक असे शिवाजी कला क्रीडा मंडळ विशाळगड . हनुमान तरूण मंडळ पेरीड . शिवशाहू तरूण मंडळ शाहूवाडी . या सह विशेष उपक्रम राबविणार्या मंडळानाही विशेष गौरवण्यात आले.
कार्यक्रमास पंचायत समिती सभापती डाॅ सौ स्नेहा जाधव ,जिल्हा परिषद सदस्या सौ आकांक्षा पाटील ,उपसभापती दिलीप पाटील ,नगराध्यक्ष अमोल केसरकर ,उपनगराध्यक्ष दिलीप पाटील ,नगरसेवक सुहास पाटील , शिवसेना तालुका प्रमुख दत्ता पोवार ,पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पडवळ,श्री यम्मेवार आदि उपस्थित होते .
कार्यक्रमासाठी सहायक फौजदार विश्वास शेडगे ,पोलीस एम वाय पाटील ,बी जी मोळके,धनाजी सराटे ,अभिजीत ऊरुणकर, पो.ना.राज्यपाल,मदने आदिनी विशेष परिश्रम घेतले .पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पडवळ यांनी आभार मानले