लक्ष्य करिअर अकॅडमी चे अद्वितीय यश
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील लक्ष्य करिअर अकॅडमी च्या १७ विद्यर्थ्यांनी मुंबई तसेच जिल्हा पोलीस विद्यार्थ्यांची वर्णी लागली, तर स्टाफ सिलेक्शन, व शिक्षक भरती मध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले आहे. अशी माहिती संचलक शरद पचकर यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना दिली.
अकॅडमी च्या वतीने यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्याचा सत्कार समारंभ बांबवडे इथं संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून येथील पोलीस उपनिरीक्षक श्री अमित पाटील ,अध्यक्षस्थानी अकॅडमी चे संस्थापक श्री रवींद्र मोरे नायब तहसीलदार उपस्थित होते. यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांच्या मान्यवरांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे श्री अमित पाटील म्हणाले कि, स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांनी जिद्द व संयम राखला पाहिजे. अभ्यासात सातत्य ठेवल्यास स्पर्धा परीक्षांमध्ये निश्चितच यश मिळवता येते. हे या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे.
यावेळी अध्यक्षस्थानी असलेले संस्थेचे संस्थापक रवींद्र मोरे म्हणाले कि,विद्यार्थ्यांनी आपल्यामध्ये आत्मविश्वास जागृत केल्यास आणि चिकाटीने अभ्यास केल्यास यश आपल्याला हुलकावणी देवू शकत नाही.यावेळी त्यांनी विद्यर्थ्यांच्या यशोगाथे चे वर्णन श्री मोरे यांनी केले. तसेच विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केलीत. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री आनंद माईंगडे सर यांनी केले..