लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्प बंद करा-अवचित नगर वासीयांची मागणी
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील अवचित नगर येथे जिल्हा परिषद च्या वतीने लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्प त्वरित बंद करण्यात यावा, अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येईल. अशा आशयाचे निवेदन अवचित नगर मधील नंदादीप तरुण मंडळ व ग्रामस्थ यांनी शाहुवाडी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे कि, सदर प्रकल्पामुळे येथील ग्रामस्थांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. त्यामुळे हे काम त्वरित बंद केले जावे .अशीही मागणी श्री सचिन मूडशिंग्कर व कार्यकर्ते यांनी केली आहे.