लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यामंदिर च्या वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न
शिराळा प्रतिनिधी : चिखली तालुका शिराळा येथील लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यामंदिरच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या.
शनिवार दि.२ डिसेंबर रोजी सन २०२३-२४ या वर्षाच्या, वार्षिक क्रीडा स्पर्धा सुरु झाल्या. या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख अतिथी देशभक्त आनंदराव बळवंतराव नाईक कॉलेज चे प्राध्यापक व क्रीडा शिक्षक श्री माने यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी आपल्या मनोगतातून श्री माने सर यांनी खेळाचे महत्व पटवून देत, अनेक खेळांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री. डी.पी. गवळी सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यानंतर स्पर्धांना सुरुवात झाली. या स्पर्धेमध्ये बालवाडी ते इय्यत्ता ८ वी पर्यंत च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी १ ली, २ री व तिसरी, चौथी व पाचवी ते आठवी असे तीन गट पाडण्यात आले. या गटातील पंचांचे काम वर्गशिक्षकांनी पाहिले.
या क्रीडा स्पर्धेचे नियोजन क्रीडा विभाग प्रमुख सौ मनीषा पाटील व संग्राम पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे आभार सौ शोभा पाटील यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता केली.