पुणेचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांचे निधन
पुणे (प्रतिनिधी ) : पुणे महानगर पालिकेचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांचे आज सकाळी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.
नवनाथ कांबळे नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे ‘मॉर्निंग वॉक’ ला गेले होते. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास त्यांना चालत असतानाच, हृदय विकाराचा झटका आला. त्यांना उपचारार्थ रुबी रुग्णालयात दाखल केले. तत्पूर्वीच त्यांची प्राण ज्योत मालवली होती.
नवनाथ कांबळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या शहराध्यक्ष पदावर कार्यरत होते. तसेच दलित पँथर मध्येही ते कार्यरत होते. त्यामुळे आंबेडकर चळवळीतील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी हॉस्पिटल मध्ये उपस्थिती दर्शविली होती.१९९७ साली ते सर्वप्रथम नगरसेवक बनले होते. यामुळे त्यांचा लोकसहावासअधिक होता . त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच हॉस्पिटल जवळ कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले.