लोकनेते फत्तेसिंगराव नाईक ट्रस्ट च्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
शिराळा प्रतिनिधी : सागाव तालुका शिराळा येथे शिराळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मानसिंग भाऊ नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त लोकनेते फत्तेसिंगराव नाईक इंडोमेंट ट्रस्ट च्या वतीने मोफत वही वाटप व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ संपन्न झाला.

या अनुषंगाने सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी कॉंग्रेस चे अध्यक्ष विराज नाईक यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वहिवाटप व गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार समारंभ संपन्न झाला.

यावेळी श्री नाईक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास विश्वास कारखान्याचे माजी संचालक मानसिंगराव पाटील, संचालक बाबासो पाटील, सरपंच तात्या पाटील, मुख्याध्यापक आर.एम.खोत, विनायक पाटील, रणजीत लोहार, उदय पाटील, शुभम पाटील, रवींद्र तानवडे, अक्षय संकपाळ, तसेच शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारीवृंद, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येवर उपस्थित होते.