लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यामंदिर च्या चिमुकल्यांची ” वारकरी दिंडी “
शिराळा : चिखली तालुका शिराळा येथील लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यामंदिर च्या वतीने आषाढी एकादशी निमित्त चिमुकल्यांनी दिंडी काढली. हि दिंडी नाटोली, चिखली गावातून काढण्यात आली.

आषाढी एकादशी निमित लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यामंदिर च्या वतीने काढण्यात आलेल्या दिंडी द्वारे विद्यार्थ्यांनी चिमुकले विठ्ठल आणि रखुमाई यांच्यासह अनेक संत सज्जन, दिंडीत आपल्या वेशभूषेच्या माध्यमातून उतरवले होते.

या चिमुकल्यांच्या वारीतून पाण्याचे महत्व, पर्यावरण बचाव, च्या घोषणा देत, आपले सामाजिक कर्तव्य निभावले आहे. तसेच चिमुकल्यांच्या हातात विविध सामाजिक संदेश देणारे फलक घेतले होते. हि वारी चिखली, नाटोली, पासून गोरक्षनाथ मंदिर पर्यंत निघाली होती.

या उपक्रमात सर्व शिक्षकवृंद, मुख्याध्यापक डी. पी. गवळी सर, तसेच शाळेचे वाहन विभाग व पालक वर्ग मोठ्या संख्येवर उपस्थित होता. दरम्यान संस्थेचे कार्याध्यक्ष भूषण नाईक यांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले.