कोडोलीमध्ये ‘ माणुसकीची भिंत ‘ एक हात मदतीचा….
कोडोली प्रतिनिधी:
कोडोली ता.पन्हाळा येथील सर्वोदय चौक येथे ‘ सुरभि हेल्थ क्लब ‘ च्या वतीने आज दिनांक १९ जून रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ‘ माणुसकीची भिंत ‘ हा उपक्रम राबविण्यात आला.
समाजाचे ऋण फेडण्यासाठी व आपली एक सामाजिक बांधिलकी म्हणून ‘ एक वही गरजूंसाठी ‘ भेट देण्याचे या उपक्रमातून आवाहन करण्यात आले. या उपक्रमाची सुरुवात कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला.
यावेळी कोडोली गावचे सरपंच नितीन कापरे, उपसरपंच निखिल पाटील ,सुरभि हेल्थ क्लबचे संदीप कुंभार, उदय चौगुले, वैभव चंद्स, चौगुले मॅडम तसेच ‘सुरभि हेल्थ क्लब ‘ चे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.