लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यालय चिखली इथं रक्षाबंधन सोहळा संपन्न
शिराळा प्रतिनिधी : लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यालय चिखली तालुका शिराळा इथं रक्षाबंधन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या दिवशी शाळेतील विद्यार्थीनिंनी विद्यार्थ्यांना राखी बांधून हा सोहळा संपन्न केला.

रक्षाबंधन हा सोहळा बहिण भावांच्या प्रेमाचं आणि भावनिक बंधनाचं प्रतिक आहे. याचबरोबर लहान वयात देखील जबाबदारी पेलण्याची ताकद भावांमध्ये निर्माण व्हावी, याचं ही ” राखी ” प्रतिक आहे. भावांनी आपल्या बहिणीच्या संरक्षणाची जबाबदारी उचलावी, हि नैतिक जबाबदारी प्रत्येक भावाची असते. हेच हा रक्षाबंधन सण समाजाला दाखवत आहे.

हा सोहळा शाळेत साजरा करून, शाळा व्यवस्थापनाने हि जबाबदारी घेण्याची परंपरा आपल्या विद्यार्थ्यांना दाखवली आहे.

हा कार्यक्रम मुख्याध्यापक डी.पी. गवळी सर आणि शिक्षकवृंद आणि सहकारी यांनी मोठ्या उत्साहात संपन्न केला.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डी.पी. गवळी व पालक प्रतिनिधी म्हणून श्री श्रीकांत पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना श्री खबाले सर यांनी केले.कार्यक्रमावेळी शाळेचे सर्व शिक्षक उपस्थित होते.