वारणा कापशी येथून ६ वर्षांचा आरव केसरे बेपत्ता
बांबवडे : वारणा कापशी तालुका शाहुवाडी येथील आरव राकेश केसरे वय ६ वर्षे हा मुलगा काल दि. ०३ ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी ६.०० वाजल्यापासून बेपत्ता झाला आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार आरव सायंकाळी ६.०० खेळायला जातो, असे सांगून घरातून बाहेर गेला. तेंव्हापासून तो बेपत्ता झाला आहे. याबाबत गावातून अनेक चर्चांना ऊत आला आहे. दरम्यान आरव ला शोधण्याचा प्रयत्न सातत्याने सुरु असल्याचे समजते.
दरम्यान सदर मुलगा कोणास सापडल्यास ७८२२८१८१५५ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.