विकासाचे नवे पर्व : श्री अमरसिंह पाटील
बांबवडे : सरूड जिल्हापरिषद मतदारसंघातून श्री अमरसिंह हंबीरराव पाटील हे निवडणूक लढवीत असून, ते प्रचारकार्यात आघाडीवर असल्याचे समजते. त्यांच्या सोबत सरूड पंचायत समिती च्या उमेदवार सौ. डॉ. धनश्री जयवंत पाटील यादेखील आघाडीवर आहेत.

सरूड जिल्हापरिषद मतदारसंघात एकूण २१ गावे समाविष्ट आहेत. सदर गावाचा एक दौरा आटोपून श्री अमरसिंह व डॉ. धनश्री पाटील यांनी दुसऱ्यांदा दौऱ्यास सुरुवात केली आहे. ग्रामस्थांच्या प्रत्यक्ष भेटीवर त्यांनी जोर दिला असून, प्रत्येक घरी जावून आया, बहिणींना आपल्या उमेदवारीचे महत्व पटवून देत आहेत.
ज्या मंडळींना मतदारसंघ माहित नाहीत, ते मतदारसंघात येवू घातले आहेत. तेंव्हा सर्व मतदारांनी चाणाक्षपणे उमेदवार निवडावे, असे आवाहन श्री अमरसिंह पाटील यांनी केले. आज ते पाटणे व सांबू गावाच्या दौऱ्यावर आहेत.
अमरसिंह यांच्या पाठीशी तरुण वर्ग खंबीरपणे असल्याचे गावोगावी दिसत आहे. त्यांच्यासोबत डॉ. धनश्री पाटील यादेखील तितक्याच तत्परतेने निवडणूक प्रचारात उतरलेल्या दिसत आहेत.
