educationalRecentनोकरी विषयकसामाजिक

विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी “ ग्लोबल कॉम्प्यूटर “ पुन्हा सज्ज

बांबवडे : कोरोना संक्रमण काळातील सक्तीच्या सुट्टीनंतर, आपलं ग्लोबल कॉम्प्युटर इंस्टीट्युट बांबवडे ता.शाहुवाडी येत्या १ जुलै पासून पुन्हा सुरु होत आहे. सोशल डीस्टंसिंग चे भान आपण ठेवणार आहोत. त्याचबरोबर आपल्या विद्यार्थ्यांचे आरोग्य जपण्यासाठी सॅनिटायझर चा देखील वापर आपण करणार आहोत. आपल्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याची दक्षता घेणे, हे आमचे कर्तव्य आहे. आपल्या विद्यार्थ्यांसाठी यंदाच्या पावसाळ्यात प्रवेशासोबत छत्री मोफत देण्याचे ठरविले आहे, अशी माहिती संस्थेच्या प्राचार्या मंजिरी पवार यांनी “ एसपीएस न्यूज ” शी बोलताना सांगितले.

कॉम्प्यूटर टायपिंग चे प्रशिक्षण आपल्या भावी काळातील प्रगतीची चाके मानावयास हरकत नाही. कारण आज तिसरी, चौथीची मुले सुद्धा कॉम्प्यूटर वापरावयास लागली आहेत, आणि त्याची तितकी गरज सुद्धा आहे. हे आपल्याला या कोरोना संक्रमणाच्या काळात समजून चुकले आहे. लहान विद्यार्थ्यांना सुद्धा ऑनलाईन शिक्षण घेण्याची जेंव्हा गरज भासली, तेंव्हाच कॉम्प्यूटर टायपिंग चे प्रशिक्षण घेणे किती गरजेचे आहे, याची जाणीव झाली.

Advertisement

म्हणूनच विद्यार्थ्यांनी आजच आपला प्रवेश निश्चित करा. तुमच्या उज्वल भविष्यासाठी आम्ही घेतो प्रशिक्षणाचे लेक्चर, त्याचबरोबर नेहमी सुरु असते, स्पीड ची प्रॅक्टीस, ऑब्जेक्टीव्ज ची प्रात्याक्षिके. तेंव्हा लवकर प्रवेश घ्या, आणि उज्वल भविष्याला सुरुवात करा.

याचबरोबर पहिल्या २० प्रवेशांसाठी पावसाळ्यात छत्री मोफत देत आहोत. तुम्ही फक्त एक पाऊल टाका, उरलेली प्रगती आम्ही करून घेवू. असेही प्राचार्या सौ. मंजिरी पवार यांनी सांगितले.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!