शनिवार दि.२६ ऑगस्ट ला सरुडात मोफत ‘ आरोग्य शिबीर ‘
सरूड प्रतिनिधी :
सरूड येथील विश्वास फौंडेशन च्या विद्यमाने व सचिन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल , कोल्हापूर यांच्या सहकार्याने सरूड तालुका शाहुवाडी इथं शनिवार दि. २६ ऑगस्ट रोजी हृदयरोग, मधुमेह, त्वचारोग चिकित्सा व मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आल्याची माहिती संयोजकांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर ) यांच्या संकल्पनेतून होणाऱ्या या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून डॉ. सचिन पाटील (एम. डी. मेडिसिन ) ,डॉ. बिंद्रा पाटील ( त्वचारोग तज्ञ ), डॉ. संतोष सरुडकर (एम.डी. रेडीओलॉजिस्ट ), डॉ.सुनील कदम हे तज्ञ डॉक्टर्स शिबिरार्थींची आरोग्य तपासणी करून मार्गदर्शन करणार आहेत.
श्री निनाईदेवी मंदिर ,सरूड इथं शनिवार दि.२६ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या निर्धारित वेळेत शिबीर होत असून, लाभ घेवू इच्छिणाऱ्या संबंधितांनी आपले पूर्व तपासणी अहवाल (रिपोर्ट ) व सुरु असणाऱ्या औषधांची माहिती सोबत आणावी, असे आवाहन या प्रसिद्धी पत्रकाद्वारे संयोजकांनी केले आहे. अशोक नांगरे , शिवाजी डांगे, प्रवीण राठोड, हेमंत तेलवेकर या संयोजकांनी हे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.