विरळे च्या ” नामू आज्यांची ” नवी पर्यावरणवादी परंपरा
विरळे : विरळे तालुका शाहुवाडी इथं स्व. नामदेव कृष्णा पाटील (नामू आज्या ) यांच्या रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम वृक्षारोपण करून करण्यात आला.

माणसाने अंधश्रद्धा न मानता पर्यावरणावर प्रेम करावे, कारण निसर्ग हाच आपला खऱ्या अर्थाने सोबती असतो. माणूस मेल्यानंतर जर त्याला अनेक वर्षे आपलं नाव अजरामर करायचं असेल, तर त्यांनी आपला देह निसर्गाला दान करावा, ज्या माध्यमातून तो चिरकाल टिकेल. म्हणून, माझी माती खड्ड्यात टाकून किंवा जिथे टाकाल तिथे वृक्षारोपण करा, असे मत नामू आज्यांनी मरणापूर्वी आपल्या आप्तेष्टांना , मित्र मंडळींना सांगितले होते.

त्यांच्या पश्चात कृष्णा, सुरेश, विश्वास पाटील त्यांच्या या तीन मुलांनी त्यांची इच्छा पूर्ण केली. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

स्व. नामदेव पाटील हे स्व.संजयसिंह गायकवाड यांचे निष्ठावंत कार्यकर्ते होते.

रक्षाविसर्जनास गोकुळ चे संचालक कर्णसिंह गायकवाड, बयाजी पाटील, बबन पाटील, विरळे चे सरपंच कृष्णा पाटील, संपत पाटील, विनोद माजलेकर, तसेच कानसा खोऱ्यातील अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.