जि.प.बांधकाम शाहुवाडी यांच्यावतीने बांबवडे इथं वृक्षारोपण
बांबवडे : कोल्हापूर जिल्हा परिषद बांधकाम विभाग शाहुवाडी तालुका यांच्यावतीने श्री.अविनाश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बांबवडे येथील स्टोअरच्या जागेत वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी श्री.गायकवाड म्हणाले कि, आम्ही तालुक्यातील वृक्षारोपणाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे.
यावेळी श्री. अविनाश गायकवाड जि.प. उपभियंता, एस.ए. मोळे शाखा अभियंता, जिल्हा परिषद सदस्य श्री. विजय बोरगे, पंचायत समिती सदस्या अश्विनी पाटील, सरपंच गजानन निकम, सर्जेराव पाटील, उमेश चव्हाण, सर्जेराव राबाडे ( महाराज ), महादेव चव्हाण, मधुकर चव्हाण, पंडित चव्हाण, युवराज पाटील, विशाल साठे, संजय माने,दै.पुढारी आनंदराव केसरे व ग्रामस्थ उपस्थित होते.