वीज कंपनी च्या कनिष्ठ अभियंत्यास लाच घेताना अटक
कोल्हापूर: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्यास एक हजार रुपयांची लाच घेताना , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयाच्या वतीने अटक करण्यात आली आहे.

पन्हाळा तालुक्यातील देवाळे परिसरात एका व्यक्तीला फॅब्रीकेशन व्यवसाय सुरु करायचा होता. यासाठी वीज वितरण कंपनीकडे नवीन वीज कनेक्शन जोडणी साठी अर्ज केला होता. यावेळी येथील साईनाथ सणगर या अधिकाऱ्याने त्या व्यावसायिकाकडे एक हजार रुपये लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंध कार्यालयाकडे तक्रार केली होती. दरम्यान साईनाथ सणगर यांनी त्यांचा पंटर शिरीष शेटे याला लाच घेण्यासाठी पुढे केले होते. दरम्यान शिरीष शेटे व कनिष्ठ अभियंता साईनाथ सणगर या दोघानाही अटक करण्यात आली आहे.

हि कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार संजीव बंबर्गेकर , विकास माने, कृष्णात पाटील, नवनाथ कदम, सुरज अपराध आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे.