सोमवारपेठ ,शिराळा येथून मोटरसायकल चोरली
शिराळा : शिराळा येथील मारुती दत्तात्रय गायकवाड (वय ५९ वर्षे )यांची हिरोहोंडा मोटरसायकल क्र.एम.एच.१०-ई-४४७३ चोरीस गेली आहे. याबाबतची फिर्याद गायकवाड यांनी शिराळा पोलीस ठाण्यात केली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी कि,मंगळवार दि.४ जुलै रोजी सायंकाळी ४ ते रात्री साडे आठ वाजण्याच्या दरम्यान सोमवार पेठ येथील दत्त मेडिकल समोरून अज्ञात चोरट्याने हि मोटरसायकल चोरली आहे.