व्यथांची जाणीव असलेला “आपला माणूस ” : पाच कोटींचा निधी मंजूर – विजयराव बोरगे पैलवान
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील जि.प.स. विजयराव बोरगे यांनी पाठपुरावा केल्याने पाच कोटी रुपयांचा निधीस प्रशासकीय मान्यता मिळवली आहे. आपल्या मतदारसंघात स्वच्छता व ग्रामीण पाणी पुरवठा यासाठी उपरोक्त निधी मिळवला आहे. याबाबत मतदारसंघातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.

बांबवडे जि.प. मतदारसंघात बोरगे पैलवान यांनी प्रत्येक गावात जावून, त्यांच्या व्यथा ऐकल्या होत्या. इथं पाणीपुरवठा योजनांची अत्यावश्यकता आहे. हे त्यांच्या कानी आले होते. यातून त्यांनी वाडीचरण साठी ६२७६३००/- , डोणोली साठी १९७६०००/-, थेरगाव साठी ९२४५६००/- सध्या १७४९७९००/- एवढा निधी मंजूर असून, लवकरात लवकर काम सुरु होईल, तसेच उर्वरित निधी सुद्धा लवकरच येईल, असे विजयराव बोरगे यांनी सांगितले.

विजयराव बोरगे हे पैलवान म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहेत. एक साधा आणि विशेष म्हणजे “आपला माणूस ” म्हणून त्यांनी नाव कमावलं आहे. या मतदारसंघात प्रत्येक गावातील प्रत्येक प्रभागातील माणूस त्यांच्या परिचयाचा आहे. त्यामुळे प्रत्येक जण त्यांच्यासमोर येवून आपली व्यथा त्यांच्यासमोर मांडत असतो. त्यामुळे त्यांना भागातील अनेक गोष्टींच्या उणिवांची त्यांना जाणीव आहे. त्यामुळे त्यांचा असलेला जिल्हापरिषद पातळीवर संपर्क, याचा त्यांनी आधार घेवून आपल्या विभागातील लोकांसाठी निधी आणला आहे. यामधून लोकप्रतिनिधीना आपल्या मतदार संघातील जनतेच्या व्यथांची जाणीव आहे. हे निदर्शनास येत आहे. असा हा ” आपला माणूस ” नेहमीच आपल्या सोबत राहावा, अशी भावना जनतेतून व्यक्त करण्यात येत आहे.