एकनाथ खडसे यांचा भाजप लाच टोला
मुंबई ( प्रतिनिधी ) :उद्योग विभागाकडून औद्योगिक कामांसाठी दिला जाणारा भूखंड हा औद्योगिक कामांसाठी न वापरता त्याचे प्रयोजन बदलण्यात येत असून या कामांमध्ये कोट्यावधीची हेराफेरी होत असल्याचा आरोप माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आपल्याच सरकारच्या विरोधात म्हणजेच भाजपच्याच विरोधात केला आहे.
विधानसभेत अर्थसंकल्पातील गृह,नगरविकास,उर्जा, पर्यावरण,आदि विभागाच्या अनुदानाच्या मागण्या मंजूर करण्यात आल्या,यावेळी झालेल्या चर्चेप्रसंगी त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.