शहीद अमित साळुंखे यांच्या स्मारकासाठी जागा मिळावी- सौ सुनीता साळुंखे : जय हिंद फौंडेशन च्या वतीने सन्मान
बांबवडे : शहीद अमित भगवान साळुंखे राहणार चरण तालुका शाहुवाडी इथं स्मारकासाठी जय हिंद जागा मिळावी, बांधकामाचा खर्च आम्ही करतो. अशी मागणी शहीद अमित साळुंखे यांच्या आई सुनिता साळुंखे यांनी यावेळी केली.

जय हिंद फौंडेशन यांच्या वतीने शहीद अमित साळुंखे यांच्या वीरमाता व विरपिता यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच ८४००/-रुपयांचा धनादेश देखील त्यांना जय हिंद फौंडेशन च्यावतीने प्रदान करण्यात आला.

यावेळी फौंडेशन चे आर.वाय.राजपुरे यांनी संस्थेविषयी ची माहिती उपस्थितांना दिली. संस्था शहीद माता, पित्यांचा सन्मान संस्थेच्या वतीने नेहमीच करण्यात येतो. त्याच पद्धतीने शहीद अमित साळुंखे यांच्या मातापित्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी सुभेदार तुकाराम जाधव यांनी सुद्धा निवृत्त सैनिकांसाठी मदत करण्यासाठी, संस्था नेहमीच कार्यरत आहे.

दरम्यान यावेळी शहीद माता पित्यांना समाजातून जो त्रास होतो, याविषयी सुद्धा फौंडेशन ने लक्ष घालावे. माझे भाऊ शहीद नानाश्री भगवान माने-आंदळकर यांच्या मातोश्री ना सुद्धा त्रास देण्यात येतोय. याविषयी सुद्धा लक्ष घालावे, अशी विनंती सुद्धा सौ पूनम गोळे यांनी केली.
यावेळी विरपिता भगवान गणपती साळुंखे, अश्विनी साळुंखे, बाजीराव वारंगे , हावळे सर, निवृत्त सुभेदार तुकाराम जाधव, सागर माने, सुभाष बोर्गेव ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.