शाहुवाडीत आज १५ नवे रुग्ण
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यात आज नवे १५ कोरोना बाधित रुग्ण निष्पन्न झाले आहेत. गेले काही दिवस शाहुवाडी तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या अधिक येत आहे. यामुळे शाहुवाडीकरांची धास्ती अधिक वाढू लागली आहे.
बांबवडे येथील महात्मा गांधी विद्यालयात क्वारंटाईन असलेल्यांपैकी साळशी पैकी भोसलेवाडी येथील एक रुग्ण निष्पन्न झाला आहे.
दरम्यान शाहुवाडी तालुक्यातील कांडवण -१, भेडसगाव -१, पिशवी -२, गावडी -२, शिवारे -२, हुंबोली -२, गजापूर -१, जांबूर -३, साळशी पैकी भोसलेवाडी -१ असे तालुक्यातील एकूण १५ रुग्ण निष्पन्न झाले आहेत.