राजकीयसामाजिक

शाहुवाडी च्या सुनबाई श्रीमती ऋतुजा रमेश लटके बिनविरोध निवडणुकीच्या वाटेवर : भाजप चे मुरजी पटेल यांची माघार


बांबवडे : शाहुवाडी तालुक्याच्या सुनबाई असलेल्या श्रीमती ऋतुजा रमेश लटके या अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवीत आहेत. त्यांच्या विरोधात भाजप चे मुरजी पटेल यांनी अर्ज भरला होता. परंतु आज दि. १७ ऑक्टोबर २०२२ रोजी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी भाजप ने आपला उमेदवार माघार घेत असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे श्रीमती ऋतुजा रमेश लटके यांची उमेदवारी बिनविरोध निवडून येण्यातील अडथळा दूर झाला असून, त्यांची उमेदवारी बिनविरोध जाहीर होत आहे.


यावेळी मविआ च्या उमेदवार असलेल्या शिवसेनेच्या ऋतुजा रमेश लटके यांनी सगळ्यांचेच आभार मानले आहे.


यावेळी भाजप पक्षाने दिलेले आदेश मान्य असल्याचे मुरजी पटेल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!