शाहुवाडी तालुक्यात १० कोरोनाबाधित : काळजी घेण्याचे आरोग्य सभापतीं श्री हंबीरराव पाटील यांचे आवाहन
शाहुवाडी : शाहुवाडी तालुक्यात आज १० जण कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. शुक्रवार दि.९ एप्रिल रोजी शाहुवाडी तालुक्यात एका वृद्धाचा कोरोना ने मृत्यू झाला आहे. शाहुवाडी तालुक्यात पुन्हा एकदा कोरोना ने डोकं वर काढलं आहे. तेंव्हा तालुक्यातील जनतेने स्वत:ची काळजी घेणे गरजेचे आहे. असे आवाहन कोल्हापूर जिल्हा परिषद चे बांधकाम व आरोग्य सभापती श्री हंबीरराव पाटील यांनी आवाहन केले आहे.

दरम्यान, मलकापूर -१ पुरुष, येळाणे १ पुरुष, सरूड ४ पुरुष, १ महिला, सुपात्रे १ महिला, उखळू १ महिला, १ मुलगा, असे एकूण शाहुवाडी तालुक्यात १० जण कोरोनाबाधित झाले आहेत.