‘ गौराई कशाच्या पावलाने आली, सोन्या-मोत्याच्या पावली आली ‘
बांबवडे : गणरायापाठोपाठ गौराई चे आज दि.२९ ऑगस्ट रोजी आगमन झाले. गणरायाच्या आगमनाने वातावरण चैतन्यमय झाले असून ,आज गौराई सोन्या-मोत्याच्या पावलाने आली आहे. त्यामुळे ज्यांच्या घरी गौराई चे आगमन होते, त्यांच्या घरात उत्साहाचे वातावरण निर्माण होते.
ज्यादिवशी गौरीचे आगमन होते, त्यादिवशी भाजी-भाकरीचा नैवेद्य दाखविला जातो. दुसऱ्या दिवशी पुरण पोळीचा नैवेद्य असतो. या दिवसात माहेरवाशिणी आपल्या माहेराला येतात,त्यामुळे लाडकी लेक परत घरी आल्याने घरात आनंदाचे वातावरण निर्माण झालेले असते. तसेच माहेरवाशिणी संध्याकाळी गौराई ची गाणी म्हणत फेर धरतात. आणि दुसऱ्या दिवशी दही-भाताचा नैवेद्य दाखवून गौराई चे विसर्जन केले जाते.