शाहुवाडी तील सर्व स्वस्त रेशन दुकानदार ISO मानांकन प्राप्त प्रमाणित – श्री गामाजी ठमके
बांबवडे : शाहुवाडी तहसीलदार कार्यालयाकडून तालुक्यातील स्वस्त रेशन धान्य दुकानदारांना ISO मानांकन देण्यात आले आहे. त्या आशयाचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. अशी माहिती स्वस्त रेशन धान्य दुकानदार संघटनेचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष गामाजी ठमके यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना दिली.

श्री ठमके पुढे म्हणाले कि, शाहुवाडी तालुक्यातील सर्व स्वस्त रेशन धान्य दुकानदारांना हे ISO मानांकन प्राप्त झाले आहे. त्या आशयाचे प्रमाणपत्र शाहुवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय पाटील यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात मला देण्यात आल आहे.

. तालुक्यातील सर्व स्वस्त रेशन धान्य दुकानदारांना हे ISO प्रमाणपत्र देण्यात आले आहे. दरम्यान पुणे महसूल विभागाच्यावतीने एक समिती निरीक्षणासाठी गेल्या काही महिन्यांपूर्वी आली होती. त्यांनी स्वस्त धान्य दुकानदारांकडे उपलब्ध असणाऱ्या सोयी सुविधा, दुकानातील नीटनेटकेपणा, स्वच्छता, तसेच दुकानाचे कागदोपत्री व्यवस्थापन , अशा अनेक गोष्टी दृष्टीसमोर ठेवून , हे ISO मानांकन कोल्हापूर जिल्ह्याला मिळाले आहे. त्यापैकी शाहुवाडी तालुक्याला सुद्धा ISO मानांकन प्राप्त झाले आहे. यानिमित्त सर्व स्वस्त रेशन धान्य दुकानदारांचे अभिनंदन देखील गामाजी ठमके यांनी केले आहे.

यावेळी शाहुवाडी तहसील कार्यालयाचे तहसीलदार गुरु बिराजदार, पोलीस निरीक्षक विजय पाटील व मान्यवर यावेळी उपस्थित होते.