शाहुवाडी पंचायत समिती च्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न : स्वातंत्र्याचा महोत्सव उपक्रम
मलकापूर प्रतिनिधी : शाहुवाडी पंचायत समिती च्यावतीने स्वातंत्र्याचा महोत्सव या उपक्रमा अंतर्गत शाहुवाडी पंचायत समितीच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न झाले. या निमित्त एका नव्या पर्वाची सुरुवात शाहुवाडी पंचायत समिती च्यावतीने करण्यात आली.

शाहुवाडी पंचायत समितीचे सर्व खातेप्रमुख व कर्मचारी मिळून यांनी हे रक्तदान शिबीर संपन्न केले. रक्त संकलन करण्यासाठी सीपीआर रुग्णालय यांच्यावतीने डॉक्टरांचे पथक आले होते.

यावेळी सुमारे १०६ रक्तदात्यांनी रक्तदानाचे महान कार्य पूर्ण केले. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद लाभला असून, या अनुषंगाने गटविकास अधिकारी श्री अनिलकुमार वाघमारे यांनी सर्व रक्तदात्यांचे तसेच ज्यांनी या शिबिरास सहकार्य केले अशा सर्व खातेप्रमुख, कर्मचारी वृंद तसेच सीपीआर रुग्णालयाचे डॉक्टरांचे पथक या सर्वांचे आभार मानले.

यावेळी श्री वाघमारे यांच्यासह सहाय्यक गटविकास अधिकारी संदीप कोटकर, पाणीपुरवठा उपभियांता रमेश घोलप, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एच.आर. निरंकारी, विस्तार अधिकारी पराग कानडे, कृषी विस्तार अधिकारी अविनाश नारकर, गटशिक्षण अधिकारी नंदकुमार शेळके, ग्रामविस्तार अधिकारी ए. पी. पजई, यांच्यासह सर्व खातेप्रमुख कर्मचारी वृंद यावेळी उपस्थित होते.